दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री काजोल आणि तिच्या कुटुंबाने मुंबईतील जुहू येथे दुर्गापूजेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन व्यतिरिक्त रणबीर कपूर, राणी मुखर्जी, मौनी रॉय यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी दुर्गापूजेला हजेली लावली. यादरम्यान काजोल आणि जया बच्चन एकमेकांना भेटल्या आणि पॅपराझींना पोझ दिल्या. यावेळी काजोलची ही मस्ती पॅपराझींनी कॅमेऱ्यात कैद केली. व्हारयल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जया मास्क घालून पूजा पंडालमध्ये प्रवेश करते. काजोलने तिचे स्वागत केले पण या दरम्यान ती गमतीने जयाकडे बोट दाखवते आणि म्हणते,
‘मास्क काढावाच लागेल, काहीही असो’. जया बच्चन यांचं हास्य मास्कच्या मागे लपलेलं दिसतं. काजोलची आज्ञा मानून आणि तिला खूश करण्यासाठी जया बच्चन त्यांचा मास्क काढून पोझ दिली. दोघांमधील हे क्यूट बाँडिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे.
यासोबतच अभिनेत्री राणी मुखर्जीही दुर्गा दर्शनासाठी या पंडालमध्ये पोहोचली होती. काजोल आणि राणी मुखर्जी यांनीही एकमेकांसोबत जोरदार पोज दिल्या आणि फोटो क्लिक केले. राणी मुखर्जी, जया बच्चन आणि काजोलचे सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
जया आणि काजोलची बॉन्डिंग बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. दोघेही ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात ही जोडी सासू सुनेच्या भूमिकेत होती. हा चित्रपट 2001 साली प्रदर्शित झाला होता. दोन दशकांनंतरही हा चित्रपट लोकांना आवडतो. हा चित्रपट एक संपूर्ण पॅकेज होता, ज्यामध्ये भावनांपासून मजा आणि ग्लॅमरपर्यंत सर्व काही दाखवण्यात आले होते.या चित्रपटाची गाणी, लोकेशन्स, संवाद, परफॉर्मन्स, कलाकार, क्लायमॅक्स आणि इतर सर्व काही इतके आयकॉनिक आहे की लोक हा चित्रपट कधीच विसरू शकत नाहीत. या चित्रपटात काजोल-जयासोबत अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करीना कपूर आणि हृतिक रोशनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.



0 Comments