कानपूर :कानपूरच्या बिल्हौरमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय.
सध्या पोलिसांनी बचावकार्य सुरू केलं असून गंगा नदीत त्यांचा शोध सुरू आहे. घाटावर मोठ्या संख्येनं लोक जमू लागले आहेत. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. शिवाय, आरोग्य विभागाच्या सहा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
कानपूर नगरच्या पश्चिमेला सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या अरौल शहरातील बरांडा गावात राहणाऱ्या संदीप कटियार यांनी मकानपूर रोडवर कपड्यांचं नवं दुकान सुरु केलं आहे. रविवारी या दुकानाचं उद्घाटन झालं. या उद्घाटनाला कटियार यांचे कानपूर आणि फारुखाबाद येथून नातेवाईक आले होते.
यावेळी नातेवाईकांसह मुलं गंगा नदीत आंघोळीसाठी गेली असता ही दुर्घना घडली. यामध्ये अनुष्का उर्फ दिव्या कुमार, बहीण अंशिका, मुलगा राम सिंह, फारुखाबादमधील रामबाबू, तनुष्का, अनुष्का, सृष्टी आणि गौरी यांच्यासह आठ ते दहा जण आंघोळीसाठी कोठी घाटावर गेले होते. यावेळी यातील सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी बुडालेल्यांचा शोध सुरू केला आहे.

.jpg)

0 Comments