प्रियकराच्या मदतीने करायची चोऱ्या , दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

 

प्रियकराच्या मदतीने व्यावसायिकाच्या घरी चोरी करणाऱ्या मोलकरीण आणि तिच्या प्रियकराला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली. जिमीमा नायक आणि दीपक लोहरा अशी त्या दोघांची नावे आहेत.


त्या दोघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालाड येथे व्यावसायिक राहतात. त्यांच्याकडे जिमीमा ही गेल्या महिन्यापासून घरकाम करायची.


 व्यावसायिक हे त्यांचे दागिने कपाटात ठेवायचे. हे जिमीमाने पाहिले होते. ऑक्टोबर महिन्यात जिमीमाने अचानक कामावर येणे बंद केले. 


त्यामुळे व्यावसायिकांना हा प्रकार संशयास्पद वाटला. व्यावसायिकाने एका एजन्सीला फोन करून जिमीमाने नोकरी सोडल्याबाबत सांगितले.

 एजन्सीच्या अधिकाऱ्याने जिमीमाला अडीच लाखांचे दागिने चोरल्याप्रकरणी विचारणा केली. तेव्हा तिने दागिने चोरले नसल्याचे सांगितले.


चोरीप्रकरणी व्यावसायिकाने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

व्यावसायिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी जिमीमा आणि दीपकविरोधात गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांनी जिमीमाला ताब्यात घेतले. 


तिच्या चौकशीत दीपकचे नाव समोर आले. पोलिसांनी दीपककडून सोन्याची अंगठी जप्त केली आहे. चोरीप्रकरणी बांगूरनगर पोलिसांनी जिमीमा आणि दीपकला अटक करून न्यायालयात हजर केले होते.


Post a Comment

0 Comments