माणूस ज्यावेळी प्रेमात पडतो, त्यावेळी त्याला काहीच दिसत नाही. प्रेमाला कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. मग गरीब-श्रीमंत, किंबहुना काही वेळा वयाचेही बंधन नसते.
असाच काहीसा प्रकार पाकिस्तानमध्ये घडला आहे. प्रेमात अंधाळ्या झालेल्या एका 83 वर्षांच्या विदेशी वृद्ध महिलेने चक्क 28 वर्षांच्या तरुणाला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडले आहे.
विदेशी महिला पाकिस्तानात आली आणि या तरुणाबरोबर लग्नाची गाठ बांधली. पाकिस्तानच्या हाफजाबादमधील काझीपूरमध्ये विदेशी महिलेने 28 वर्षांच्या हाफिज नदीमसोबत धूमधडाक्यात प्रेमविवाह केला.
लग्नानंतर दोघेही खूप आनंदी आहेत. लग्नाच्या एक वर्षानंतर दोघांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये दाम्पत्य विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत आहे. ही विदेशी महिला पोलंडची रहिवासी असून दोघांची ओळख सोशल मीडियावरून झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
दोघे प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की, त्यांना चैनच पडेना. अखेर महिला पाकिस्तानात थेट आली आणि समाजाच्या रीतिरिवाजानुसार लग्न केले.
दोघांचे प्रेम फेसबुकद्वारे जुळले. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. मग हळूहळू प्रेम होऊ लागले आणि एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचे वचन देण्यात आले. हाफिज स्पेअर पार्टस्चे दुकान चालवितो. ही वृद्ध महिला प्रेमविवाह केल्यानंतर खूपच आनंदात आहे. दोघेही आपल्या भविष्याबाबत विचार करत आहेत.
0 Comments