खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले
असून त्यामध्ये पिक विमा भरलेल्या तालुक्यातील १९ हजार ८३ शेतकऱ्यांपैकी ८ हजार ४०८ शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या आहेत.
तक्रारींची दखल घेत अॅग्री इन्सुरन्स विमा कंपनीकडून बाधीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात येते आहे.
दरम्यान विमा न भरलेल्या शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे नुकसान झाले. शासनकडून मदतीबाबत कोणताच निर्णय होत नसल्याने संबंधीत शेतकरी हवालदिल झाले आहे.
पीक विमा ना सरकारी विमा अशा अवस्थेत या तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात बाजरी, तूर, मका, सुर्यफूल, भूईमूग, कांदा या पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली. सुर्यफूलाचे क्षेत्र तालुक्यात असताना विमा कंपनीकडून सुर्यफूलाला विमा सरंक्षण दिले नाही.
0 Comments