धक्कादायक, तीन विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला म्हटलं I Love You

 

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका महिला शिक्षिकेने शाळेतील ३ विद्यार्थ्यांवर छेडछाड आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर आणि शेरेबाजी केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे 


तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह एका विद्यार्थिनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार मेरठमधील किठौर पोलीस ठाण्याच्या परिसरात घडला आहे.


मेरठमधील किठौर पोलीस ठाण्याच्या परिसरातील ही संपूर्ण घटना आहे. राधना इनायतपूरच्या एका इंटर कॉलेजमधील महिला शिक्षिकेने तिच्याच शाळेतील तीन विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


शिक्षिकेने आरोप केला की, १२वीच्या वर्गातील तीन विद्यार्थी अनेक दिवसांपासून तिला त्रास देत आहेत. तिघेही अश्लील कमेंट्स करतात. त्यांना अनेकदा समजावून पाहिले. पण ते वारंवार ट्रोल करतात. तसेच वर्गातील एक विद्यार्थिनीही त्यांना साथ देते.


पीडितेने सांगितले की, हे तिन्ही विद्यार्थी कधी वर्गात तर कधी रस्त्यावर येता जाता तिची छेड काढतात. तिच्याबाबत अपशब्द वापरतात. तिघेही तिला काहीही उलटसुलट नावांनी हाक मारतात. एवढंच नाही तर या तिघांनीही एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आय लव्ह यू सुद्धा म्हटले. तसेच तो व्हिडीओ व्हायरलही केला.


दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्याने आपल्या वैयक्तिज जीवनामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे, असेही या शिक्षिकेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे तिच्या नात्यांवरही परिणाम झाला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या या कृत्यांमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आहे.


Post a Comment

0 Comments