2 वर्षाच्या मुलीची मिठीत घेऊन हत्या

 

एका टेक्नीशियनने आपल्या 2 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नव्हे तर मुलीचा जीव घेतल्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र त्यात तो बचावला.


मुलीला खायला घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे कारण त्याने पोलिसांना सांगितले.


 ही घटना 15 नोव्हेंबरची आहे. कोलार येथील केनदट्टी गावातील तलावात 16 नोव्हेंबर रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या तलावाच्या काठावर निळ्या रंगाची कारही पोलिसांना सापडली आहे.


हे पाहून गावातील लोकांनी कोलार पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडिलांचा शोध सुरू केला, त्यानंतर आरोपी वडिलांना 16 नोव्हेंबर रोजी बंगळुरू रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला.  राहुल परमार असे 45 वर्षीय आरोपीचे नाव आहे.


तो मूळचा गुजरातचा असून दोन वर्षांपूर्वी पत्नी भव्यासोबत बंगळुरूला गेला होता. 15 नोव्हेंबरपासून तो आपल्या मुलीसह बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मुलीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडल्याचे राहुलने पोलिसांना सांगितले. त्याला आत्महत्या करायची होती.


पण मुलीसमोर असल्याने तो निर्णय घेऊ शकला नाही. तो दिवसभर बंगळुरू आणि कोलारमध्ये फिरला. संध्याकाळी तलावाजवळ गाडी थांबवून तो बराच वेळ काय करायचा विचार करत राहिला. तलावाजवळील दुकानातून मुलीसाठी चॉकलेट आणि बिस्किटे खरेदी केली.


पण मुलीला दुपारपासून भूक लागली होती म्हणून ती रडतच राहिली. मुलीला दुसरे काही खायला घालण्यासाठी राहुलकडे पैसे नव्हते. त्यामुळेच त्याने मुलीसह स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला


Post a Comment

0 Comments