Instagram जास्त वेळ पाहू लागली पत्नी, पतीने उचलले टोकाचे पाऊल

 

सोशल मीडियाची अनेकांना सवय लागली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर दोन-दोन तास रिल्स पाहण्यात व्यस्त असतात.


इन्स्टाग्रामवर रिल्स पाहणे एका महिलेला जीवावर बेतले आहे. सतत इन्स्टाग्राम पाहण्याच्या कारणावरुन महिलेला तिच्याच पतीने ठार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.


ही घटना तमिळनाडू येथील तिरुपूर जिल्ह्यातील आहे. येथील ३८ वर्षीय अमृतलिंगन हे मार्केटमध्ये मजुरी करतात. 


अमृतलिंगन याची पत्नी एका कपड्याच्या फॅक्टरीमध्ये काम करत होती. हे दाम्पत्य सेलमनगर परिसरात राहत होते.


मिळालेली माहिती अशी, पत्नी सोशल मीडियावर जास्तवेळ सक्रीय होती. 

तिने इन्स्टाग्रामवर खातेही सुरू केले होते. यावर रोज जास्तवेळ रिल्स पाहण्यात व्यस्त असायची.


 यामुळे तिचे घरातील कामावरही लक्ष नसायचे. त्यामुळे पती पत्नीत रोज भांडण व्हायचे.


Post a Comment

0 Comments