तिला लायसन्स दिल कसं , समोर कार दिसताच तरुणीन नव्या स्टाईलने ब्रेक मारला

 

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होतात ज्यामध्ये मुलींच्या ड्रायव्हींग सेंन्सवर विनोद केले जातात.


अलिकडेच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तरूणीनं स्कूटी चालवत असताना जे केलं ते पाहून तुम्ही हसणं थांबवू शकणार नाही. लोक या तरूणीला पापा की परी म्हणत आहेत. 


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मुलगी स्कूटी चालवत असताना रस्त्याच्या मधोमध जात असते. पुढे गेल्यानंतर ती स्कूटीचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करते. 


त्यावेळी एक कार समोर येते पण तिला ब्रेकच मारता येत नाही आणि स्कूटी कारला ठोकते. यावरून लक्षात येतं की कदाचित गाडीचा ब्रेक लागत नसावा.

व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या तरूणीवर विनोदी कमेंट करत आहेत. पापा की परी का नया ब्रेक सिस्टिम अशी कमेंट एका युजरनं केली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ८ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.


 लोक या व्हिडिओवर अनेक कमेंट्स करत आहेत.तिला लायसन्स का दिलं अशा प्रश्न एकानं विचारला असून अशा मुली इतर व्यवस्थित ड्राईव्ह करत असलेल्या मुलीचं नाव खराब करतात असं म्हटलं आहे.


याआधीही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाल होता. ज्यामध्ये उभ्या ट्रकनं तरूणीच्या स्कूटी धडक दिली होती. आता पुन्हा याच प्रकारची घटना घडल्यानं ड्रायव्हींगवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्या व्हिडिओवरही नेटिझन्सनी एकापेक्षा एक विनोदी कमेंट करत खिल्ली उडवली होती.

Post a Comment

0 Comments