विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास

 

विवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाख रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली. 


याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


तक्रारदार महिलेच्या मुलाचा विवाह समारंभ नुकताच सातारा रस्त्यावरील वाळवेकर लाॅन मंगल कार्यालयात पार पडला. तक्रारदार महिलेने दागिने, रोकड असलेली पिशवी खुर्चीवर ठेवली होती.


 नातेवाईकांची भेटगाठ त्या घेत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी खुर्चीवर ठेवलेली पिशवी लांबविली. 


पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. 


पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण

 तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments