कार्तिक यात्रेनिमित्त मद्य विक्रीवर बंदी

सोलापूर,दि.1 (जिमाका): कार्तिकी यात्रेनिमित्त जिल्ह्यात आणि पंढरपूर शहरात सार्वजनिक शांतता राखणे 


आवश्यक असल्याने 3 आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी पंढरपूर शहरातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य विक्री, ताडी विक्री


 अनुज्ञप्त्या पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.


  कार्तिकी एकादशीनिमित्त 4 नोव्हेंबर 2022 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य विक्री, ताडी विक्री

 अनुज्ञप्त्या बंद राहतील. अनुज्ञप्तीधारकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, 


उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments