सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२) सायंकाळी लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील सन २०२१ मध्ये मयत झाले आहेत. तक्रादार यांच्या आईस मिळणाऱ्या कौटुंबिक पेन्शनचे काम करण्याकरिता सरकारी कार्यालयात गेले. यावेळी आलोसे यांनी त्यांना स्वत: आणि कर्मचारी यांच्याकरीता ६ हजार रुपये लाचेची मागणी केली.
यापैकी १५०० रुपयांचा पहिला हप्ता स्विकारला आहे. पडताळणी कारवाई दरम्यान उर्वरित ४५०० रुपयांची लाच घेताना पोलिसांनी कारवाई केली. यातील आरोपी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांचे लाचखोर प्रकरण उघडकीस येऊन ४८ तास उलटत नाहीत, तोपर्यंत आज आणखी एक सरकारी कर्मचारी महिलेस लाच घेताना पकडण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर विभागाने जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच कारवाई झाली आहे.
0 Comments