अजगराने तोंड उघडताच हरणाला गिळलं....

 

वाघ, सिंह, मगर आणि साप हे असे जीव आहेत, ज्यांच्यापासून सगळेच प्राणी लांब राहातात. प्राणीच काय तर हे जीव माणसांसाठी देखील धोकादायक आहेत. त्यांच्या तावडीत एकदा का कोणी आला तर विषयच संपला.


कधीच आपल्या शिकाराला जीव वाचवण्याची दुसरी संधी देत नाहीत. यांच्यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाल भीती वाटेल.




हा व्हायरल व्हिडीओ अजगराशी संबंधीत आहे. अजगराला अधिक धोकादायक शिकारी म्हटले तर ते चुकीचे नाही. हा महाकाय सरपटणारा प्राणी आपली शिकार जिवंत गिळतो, तो आधी आपल्या शिकाराला घट्ट विळखा घालतो, ज्यामुळे शिकाराला हलता देखील येत नाही, ज्यानंतर तो आपलं मोठं तोंड खोलून शिकाराला गिळतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये अजगराने एका हरणाला जिवंत गिळले आहे.



ते ही अनेक लोकांच्यासमोर, या घटनेचा व्हिडीओ तेथील लोकांनी शुट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही अगदी जवळून पाहू शकता की कसे अजगराने हळूहळू करुन हरणाला आपल्या पोटात ढकलले. हा काही सेकंदाचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठचा आहे हे कळू शकलेले नाही. परंतु वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो आपलोड करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर सुंदर_नवीन_पिक्स नावाच्या पेजवर व्हिडीओही अपलोड करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments