काल बुधवार 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास माणिक चौक, चाकण येथे हा अपघात घडला आहे.
फिर्यादी या नेरूळला जाण्यासाठी रांजणगाव निघाल्या. त्या बसने चाकण माणिक चौक येथे दुपारी उतरल्या.
त्या चाकण बसस्थानाकाकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना शिक्रापूर रोडकडून तळेगाव चौकाकडे जाणाऱ्या पाण्याचा टँकर फिर्यादीसमोर अचानक आला व त्याचा त्यांना धक्का लागल्याने खाली रोडवर पडल्या.
त्यावेळी फिर्यादीच्या डाव्या खांद्याला व कमरेला मार लागून दुखापत झाली आहे. त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांच्या मदतीने फिर्यादीला आस्था हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले होते.




0 Comments