माय लेकाचा नकली धंदा : पत्र्याच्या शेडात छापले 10 कोटी

 

मध्य प्रदेशात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या माय - लेकाच्या जोडीने देश विघातक कृत्य केले असून अंडरवर्ल्डच्या लोकांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने राहत्या घरालगतच ( पत्र्याचे शेड ) 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या दोन्ही आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार आई मंजु आणि मुलगा सुरज (रा. मध्य प्रदेश जिल्हा मानेगांव मुळ गाव समजू शकलेले नाही ) यांनी राहत्या घरालगत असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये हा कारभार केला आहे. या दोघांना पोलिसांनी नकली नोटा तयार करत त्या अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


या कारवाईत अधिकाऱ्यांना 2 कोटी रूपयांच्या नकली नोटा सापडल्या. त्याशिवाय आरोपीच्या दुसऱ्या ठिकाणावर डाय, प्रिंटर्स सापडले ज्याचा वापर नकली नोटा छापण्यासाठी केला जात होता. नॅशनल क्राइम एजन्सीने दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


या कारवाईबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मंजु आणि सुरज आपल्या घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापत ते कोर्टाच्या सुनावणीत कशाप्रकारे दोघे नकली नोटा छापत होते हे सांगितलं आहे. यानंतर नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने नोटा चलनात आल्यावर चौकशी करत नंतर याबाबत खुलासा केला. या सुनावणीदरम्यान न्यायालायाने मंजुला साडे सहा वर्षांची शिक्षा सुनावली, तर मुलाला 2 वर्ष बाल कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments