सोलापूर : चिमुकल्या मुलीला पाहायला पत्नीच्या माहेरी गेल्यावर भेटू न देणे, दुसरीकडे डॉ. सरोदे यांनी फोनवरून प्रेमसंबंध असल्याचे सांगितल्यापासून डॉ. असदउल्ला मानसिक तणावाखाली होते.
मृत डॉ. असदउल्ला यांनी मानसिक त्रासामुळे ३ डिसेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना डॉ. असदउल्ला यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अधिक चौकशी केली. पत्नीसह तिच्या माहेरच्यांनी दिलेल्या त्रासातूनच डॉ. असदउल्ला यांनी आत्महत्या केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
त्यानुसार मृताची पत्नी फलकनाज नजीरअहमद सय्यद, सर्फराज नजीरअहमद सय्यद, नजीरअहमद सय्यद, निखत सर्फराज सय्यद (सर्वजण रा. मोहिते नगर, होटगी रोड) यांच्यासह डॉ. मिलिंद सरोदे (रा. जळगाव) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन पेटकर तपास करीत आहेत




0 Comments