सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम राहीला नाही. रस्त्यावर घडणारी घटना कुणीतरी लपून छपून कॅमेरात कैद करतो आणि इंटरनेटवर व्हायरल करतो.
उत्तराखंडच्या रुडकी येथील रस्त्यावर तरुणींच्या एका ग्रुपमध्ये हाणामारी झाल्याची घटना व्हिडीओच्या माध्यमातून इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. तीन-चार तरुणी एकमेकींच्या झिंज्या उपटत स्टिक्सने मारहाण करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ही घटान कधी घडली आहे, याबाबती कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीय. तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं आजूबाजूच्या लोकांना कळतं. त्यानंतर ते तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन त्या तरुणींमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तरुणींमध्ये हाय-वोल्टेज ड्रामा पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.




0 Comments