गर्दीतच हात पकडला , सेल्फी घेतला अन् , भाऊ कदमची लेक आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल

 

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामध्ये मराठीसह अनेक बॉलिवूड कलाकारही हजेरी लावताना दिसतात. नुकतंच 'सर्कस' चित्रपटाच्यानिमित्ताने रणवीर सिंगने 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.


यावेळी त्याने कार्यक्रमातील कलाकारांबरोबर धमाल-मस्तीही केली. सगळ्यांचा लाडका भाऊ कदमची लेक फक्त रणवीरला भेटायला या कार्यक्रमाच्या सेटवर आली.


भाऊ कदमची लेक मृण्मयी कदम सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आताही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे रणवीरबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. दुसऱ्यांदा ती रणवीरला भेटली. पण बॉलिवूडच्या या सुपरस्टारला भेटणं हे तिचं स्वप्न होतं.


मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर तिच्याशी बोलताना दिसत आहे. तसेच तो तिचा हात पकडतो आणि मृण्मयीबरोबर सेल्फी घेतो. मृण्मयीला तिच्या नावाने तो हाकही मारतो. मृण्मयीने फोटो व व्हिडीओ शेअर करत असताना खास पोस्टही लिहिली आहे.

Post a Comment

0 Comments