भररस्त्यात बाचाबाची सुरु असताना बाजूनं पोलिसांची गाडी जाते, पण..
पुण्यातील एका तरुणानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यश नेरकर असं या तरुणाचं नाव आहे.
सध्या त्यानं पोस्ट केलेला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
चारचाकी चालक आणि दुचाकी चालकामध्ये गाडी चालवण्यावरुन वाद झाल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये दुचाकी चालकानं चारचाकीची काच फोडल्याचं दिसत आहे.
भररस्त्यात ही बाचाबाची सुरु असताना बाजूनं पोलिसांची गाडी जाते. मात्र, पोलीस तिथं थांबत नाहीत. पुणे-अहमदनगर मार्गावर वडगाव शेरीजवळ ही घटना घडलीये.
संबंधित चारचाकी चालक तरुणानं ट्विट करुन पोलीस, राज्य सरकारला पोलिसांना कायद्याचा धाक आहे का नाही? असा सवाल केलाय. तसंच माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी केलीये. ज्यानं तरुणाशी वाद घातला ती व्यक्ती पोलीस असल्याचा दावा चारचाकी चालक तरुणानं केलाय. आपल्या ट्विटरवर त्यानं पोलिस कर्मचाऱ्याचं नाव सुनील शेंगे असल्याचं नमूद केलंय. शिवाय, त्यानं त्यांच्या गाडीचा नंबरही MH12UU3811 शेअर केला आहे. या संदर्भात पोलीस काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.




0 Comments