पगाराचे पैसे न दिल्याने 20 वर्षीय तरुणाला मारहाण

 

धर्मेंद्र, संदीप आणि संतोष अशी गुन्हा दाखल झालेले आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गौरव अंकुश शेळके (वय 20) यांनी तक्रार दिली आहे.


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हे फिर्यादी यांच्याकडे पेंटिंगचे काम करत होते. दरम्यान, पगाराचे पैसे न दिल्याने आरोपींनी फिर्यादी यांना कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.


 फिर्यादीच्या डोक्यात लाकडी फळीने मारून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या गळ्यातील 74 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन, मोबाईल फोन आणि पाकीट जबरदस्तीने घेऊन गेले आहेत.


 पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments