दुर्दैवी ! चालत्या ट्रेनमध्ये खिडकीतून आलेला रॉड घुसला तरुणाच्या मानेच्या आरपार....

 

रोज नेहमीप्रमाणे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाला विचित्र अपघातात प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ठरलेल्या वेळेत तरुण कामावर जाण्यासाठी ट्रेनने प्रवास करत


 असताना अचानक धावत्या ट्रेनच्या खिडकीतून एक रॉड आत आला आणि तरुणाच्या गळ्याच्या आरपार गेला.

डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अपघात घडल्याने मुलाला आपले प्राण गमवावे लागले.


दिल्ली कानपुर निलांचल एक्स्प्रेस क्रमांक 12876 या गाडीमध्ये हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की,फक्त मुलाच्याच गळ्याच्या आरपार नाही तर डब्याच्या पत्र्याच्या आरपार हा रॉड घुसला होता. 


यामुळे इतर प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काहीशा क्षणात डोळ्यांसमोर होत्याचे नव्हते झाल्याने अनेक प्रवासी घाबरून गेले होते.


रॉड दीड इंच जाडीचा आणि पाच फूट लांब इतका मोठा होता. शुक्रवारी सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर ९.२० च्या दरम्यान अलिगड जंक्शन येथे ट्रेन थांबवण्यात आली आणि पुढील कारवाई करण्यात आली. 


मृत तरुणाचे नाव ऋषिकेश कुमार दुबे असून तो ३२ वर्षांचा होता. त्याच्या मागे पत्नी आणि २ मुलं असा संसार आहे. रॉड नेमका कोणत्या कारणामुळे आत आला याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.

Post a Comment

0 Comments