पंत एकटाच होता पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं....

 

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं. यातच ऋषभ पंतच्या अपघातातबाबत आणखी एक महत्वाची माहिती समोर आलीय. 


अपघातादरम्यान, ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता. तसेच पेटत्या वाहनातून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली, अशी माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिलीय.


अशोक कुमार यांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की, "पंत दिल्लीहून घरी परत असताना मंगळूरु आणि निरसन मार्गावर त्याची कार दुभाजकाला धडकली. ज्यामुळं कारनं पेट घेतला. अपघाताच्या वेळी ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि पेटत्या कारमधून बाहेर पडण्यासाठी त्यानं कारची खिडकी तोडली." डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतची प्रकृती स्थिर आहे. पण त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झालीय. ज्यामुळं त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments