कौटुंबिक वाद टोकाला गेल्याने 35 वर्षीय पतीने गोदा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
विशेष म्हणजे, मी स्वत:हून आत्महत्या करत आहे, त्यास कुणालाही जबाबदार धरु नये, अशी सुसाईड नोट हातावर लिहून पतीने जीवनयात्रा संपविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधेश्याम हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद दाखल होती. दरम्यान, गुरुवारी (दि.२२) सकाळी गंगापूर रोडवरील शहीद चित्ते पुलाजवळील गोदा नदीपात्रात एक अनोळखी मृतदेह आढळून आला.
गंगापूर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. त्याचवेळी हा मृतदेह बेपत्ता असलेल्या राधेश्याम याचा असल्याचे समोर आले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. त्याच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत.




0 Comments