अमरावती महापालिकेच्या शहर बसखाली चिरडुन तरूणीचा जागीच मृत्यू झाला आहे. शहरातील अशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोर हा भीषणअपघात झाला. नेहा इंगोले ( २१) असे या घटनेत दगावलेल्या युवतीचे नाव आहे.
नेहा इंगोले ही आपल्या मित्रासोबत एम.एच 27 ए. वाय. 8059 क्रमांकाच्या दुचाकीवर जात असताना विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयासमोर मित्राने अचानक दुचाकीला ब्रेक लावला. ते दोघेही रस्त्यावर पडले.
यावेळी मागून येणाऱ्या एम.एच.26 ए.जी 9965 क्रमांकाच्या शहर बसचे मागचे चाक नेहाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नेहाला खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर नेहाचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या युवकावर रुख्मिणी नगर येथील डॉ. सावदेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. या प्रकरणात गाडगेनगर पोलीसांनी शहर बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




0 Comments