लग्नाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे यासंबंधीत अनेक व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. हे व्हिडीओ लग्नातील काही विशिष्ट क्षणांचे असतात
तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. लग्न म्हटलं की मजा मस्करी ही असतेच.
त्यामुळे अशावेळी अशा काही आठवणी तयार होतात जे आपल्याला आयुष्यभर आठवणीत राहातात. असंच काहीसं या व्हिडीओमधील लोकांनी केलं.या व्हिडीओमध्ये मुलं डान्स करत आहेत. आता तुम्ही म्हणाल लग्न म्हटलं तर डान्स तर येणारच मग त्यात काय नवीन?
तर या व्हिडीओमधील मुलं नुसतंच नाचत नाहीत, तर ते लग्नामधील जेवणाची भांडी घेऊन नाचत आहेत. जेवण झाल्यानंतर लोकांनी मिळेल ती भांडी उचलली आहेत आणि नाचू लागले आहेत. कोणी टोप, कोणी वाडगं, तर कोणी ताट, अगदी पेले, चमचे घेऊन देखील डान्स केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलं नागिन डान्स करत आहेत.
हा अगदी स्टेज तोड डान्स आहे. ही मुलं रिकामी भांडी चमच्याने मारत आहेत आणि अप्रतिम नृत्य करत आहेत. लग्नसमारंभात जनरेटरच्या आवाजावर लोक नाचतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये मुले जेवणाची रिकामी भांडी मारून नाचत आहेत.
व्हिडीओ लाखो वेळा पाहिला गेला आहे. रिकामी भांडीच नाही तर काहींनी खुर्च्याही घेतल्या आहेत. लग्नात जेवण संपल्यानंतर रिकामी भांडी घेऊन नाचणाऱ्या या स्टेज तोड व्हिडीओने नेटकऱ्यांना देखील वेड लावलं आहे.
लोकांच्या या अशा विचित्र वागण्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे? हे काही कळू शकलेलं नाही. व्हिडीओ पाहून लोक मजा घेत आहेत. या व्हिडीओवर लोकांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंट करून सांगा.




0 Comments