खासगी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार

 

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणार्‍या यात्रेकरूंना खासगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण साईभक्त ठार झाल्याची दूर्दैवी घटना घडली.


अपघातानंतर फरार झालेली खासगी बस एमआयडीसी पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतली. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.


मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सिन्नर-शिर्डी महामार्गावर मंगळवारी (दि.20) पहाटे 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.


 बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या बसने धडक दिली. संजय शंभू जाधव (23) व महेश शंकर सिंग (23, दोघे रा. मीरा रोड, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही शिर्डीला जाणार्‍या पदयात्रेत सहभागी झाले होते. दुर्देवाने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments