मुलीचं लग्न अवघ्या 10 दिवसांवर अन् आईने ठोकली प्रियकरासोबत धूम

 

मुलीचं लग्न अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलं. संपूर्ण घरात लगीनघाई सुरू होती. वधू आणि वर पक्षाकडून दाग-दागिन्यांची खरेदी सुद्धा झाली. अशातच आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही, याचा फायदा घेत मुलीच्या आईने आपल्या प्रियकरासोबत धूम ठोकली.


एवढंच नाही तर जाताना तिने सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत. उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातून ही अजब घटना समोर आली आहे. 


याप्रकरणी कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून दोघांचाही शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारमधील मंगलौर परिरसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या मुलीचे लग्न ठरले होते. या महिलेला 3 मुली आणि एक मुलगा असून वर्षभरापूर्वी तिच्या पतीचं निधन झालेलं होतं.


लग्नाची तारीख 14 डिसेंबर ठरली होती. घरात अगदी आनंदाचं वातावरण होतं. पाहुण्यांची वर्दळही वाढली होती. अशातच घरात लग्नसराईचे वातावरण असतानाच, मुलीची आई मात्र तिच्या कुटुंबियांना सोडून अचानक घर सोडून तिचा प्रियकर राहुल याच्यासोबत पळून गेली. एवढंच नाही तर जाताना तिने मुलीच्या लग्नात देण्यासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले.

Post a Comment

0 Comments