लग्नात नवरीने नवरदेवासमोरचं मारली प्रियकराला मीठी अन्......

 

प्रेमासाठी मुलं किंवा मुली काहीही करू शकतात. अनेकवेळा प्रेमापोटी कित्येकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींनी आपल्या मनासारखं प्रेम न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.


पण एका पठ्ठ्याने आपल्या प्रेयसीच्या लग्नातंच तिला मिठी मारली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा नवरीसोबत डान्स करताना दिसत आहे. तर नवरदेव शेजारी उभा आहे. त्याचबरोबर गाण्याच्या शेवटी नवरी त्या मुलाला जोरदार मिठी मारत आहे. एका महिलेने त्यांची मिठी सोडल्याचं व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ समाजमाध्यामांमध्ये चांगलाच व्हायरल झाला आहे.


दरम्यान, हे काय पाहावं लागत आहे असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या प्रेमीयुगुलांनी लग्नातंच केलेला डान्स पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत.

Post a Comment

0 Comments