पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये क्रीडादिन उत्साहात साजरा

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कूल येथे शाळेचा १३ वा क्रीडादिन मोठ्‌या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती स्कूल च्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.


   पंढरपूर सिंहगड पब्लिक मध्ये क्रीडा दिनानिमित्त तहसिलदार सुशील बेल्हेकर व जिल्हा क्रिडा अधिकारी नितीन तरळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  शाळेच्या विशिष्ट गणवेशात मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध तालामध्ये विद्यार्थ्यानी संचलन सादर केले. यादरम्यान सिंहगड शाळेतील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यानी क्रीडाज्योतीची रॅली काढली. या रॅलीने अनेकांचीमने जिंकली. 


   उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना तहसिलदार सुशील बेल्हेकर म्हणाले,  "सर्व शाळांनी व पालकांनी विद्यार्थ्याना त्यांच्या खेळ व कला गुणांना वाव देण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. खेळाने मुलांची शारीरिक व बौद्ध क्षमता वाढत असते. क्रीडा दिनानिमित्त फक्त खेळ आयोजित न करताना दैनंदिन जीवनात नियमित खेळ मुलांनी खेळले पाहिजेत असे मत पंढरपूर तहसिल कार्यालयाचे तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी बोलताना व्यक्त केले.

   कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शाळेच्या विद्यार्थ्यांनी योगा, लेझीम, मनोरे, ओरोबीक्स आदी सांघिक खेळ सादर केले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.



यामध्ये शाळेअंतर्गत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे इस्टेट मॅनेजर रोहन नवले उपस्थित होते. हा क्रिडा दिन यशस्वी करण्यासाठी पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व  आभारप्रदर्शन प्राचार्या स्मिता नवले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments