पोलिस ठाण्यात आढळला चक्क विषारी साप

 

मानवी वस्ती जंगल तोडून होऊ लागल्याने वन्य, हिंसक प्राण्याचा वावर वस्तीत वाढला आहे. इमारतीत वाघ, साप आढळून आल्याच्या घटना अनेकदा पाहिल्या असतील.


अशीच एक घटना ठाण्यातील नौपाडा भागात घडली आहे. एक विषारी साप ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आढळल्याने कर्मचाऱ्यात एकच भीती पसरली. या विषारी सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात आज, रविवारी सकाळच्या सुमारास अचानक एक विषारी साप आढळून आला. विषारी साप आढळल्याने पोलीस कर्मचाऱ्यामध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. 


नौपाडा पोलिसांनी हा साप पाहताच सर्प मित्रांना पाचारण केले. सर्प मित्रांनी पोलीस ठाण्यात पोहचून हा सापाला पकडले आणि जंगलात निसर्गाच्या सानिध्यात या सापाची सुटका केली आहे.

Post a Comment

0 Comments