चौफुला येथे अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू

 

चौफुला (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर महामार्गावर बोरीपार्धी गावाच्या हद्दीत झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रवी महादेव गायकवाड (वय २२), असे त्याचे नाव आहे.



रवी हा बुधवारी (ता. १८) सकाळी अकराच्या सुमारास इनोव्हा मोटारीतून (क्र. एम.एच.१६ए.व्ही. ९९९१) वरवंड येथून चौफुलाच्या दिशेने भरधाव निघाला होता. त्याच वेळी बोरीपार्धी गावाच्या हद्दीत 'हॉटेल जोगेश्वरी मिसळ'समोर त्यांचा वाहनावरील ताबा सुटला.

 गाडी जवळपास तीन पलट्या घेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामध्ये गेली. त्यात रवी हा गाडी वाहनाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला यवत येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यास नेले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 रवी हा बार्शी येथील रहिवासी असून, तो चौफुला येथे रेणुका कलाकेंद्र येथे कामाला होता. तो ज्या ठिकाणी कामाला होता, ते कला केंद्र अवघ्या हाकेच्या अंतरावर होते. 


मात्र, काही मिनिटांच्या आतच त्याच्यावर काळाने झडप घातली. त्याचा चुलत मामा युवराज अभिमान करपे (वय ४६, रा. बार्शी) याने बुधवारी रात्री उशिरा यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास यवत पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सुनील बगाडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments