नगरहून जालन्याच्या दिशेने निघालेल्या एका बसचा आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास दहेगाव बंगला येथे अपघात झाला.
अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील जखमी हे जालना येथील रहिवासी असल्याची माहिती पाेलिसांनी दिली
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार औरंगाबाद पुणे महामार्गावर ईसारवाडीफाटा येथे दहेगाव बंगला नजीक विद्यार्थ्यांच्या सहलीच्या मिनी ट्रॅव्हल्सचा झाडाला धडकून अपघात झाला. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील जालना येथील कुटुंबातील दोन मुलांसह एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर स्थानिकांनी सर्व जखमींना पोलिसांच्या मदतीने गंगापूर येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.




0 Comments