दोन मुलांचा खून करून बापाने केली आत्महत्या

 

कांदोळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पित्याने पोटच्या दोन मुलांचा गळा आवळून खून करत स्वत: गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.



ओर्डा-कांदोळी येथे शनिवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती उघडकीस आली. या हत्‍याकांडामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला आहे.

जॉय फर्नांडिस असे हत्या केलेल्या बापाचे नाव आहे. तर मुलगी अनानिया (13) आणि मुलगा जोसेफ (8) अशी मुलांची नावे आहेत. जॉय हा अनेक वर्षांपासून बेरोजगार होता. तसेच तियात्र कलेशी निगडित होता. मोठी मुलगी अनानिया ही दोनापावला येथील एका नामांकित हायस्कूलमध्ये, तर जोसेफ हा पर्वरी येथील खासगी शिशुवाटिकेत शिकत होता.


शनिवारी दुपारी इर्निया दुपारी दोनच्या सुमारास शाळेतून घरी परतली. यावेळी दोन्ही मुले आणि पती घरीच होते. इर्नियाला एका विवाह समारंभात जायचे असल्याने तासाभरातच मुलांसह पतीचा निरोप घेत ती घराबाहेर पडली. परंतु घरी परतल्यानंतर काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच तिला प्रचंड मोठा धक्‍का बसला.

जॉय हा तियात्र कलेशी निगडित होता. ख्रिस्ती समाजात तो परिचित होता. कळंगुटचे माजी आमदार तोमाझीन कार्दोज यांच्या कार्यकाळात कला अकादमी पुरस्कृत तियात्र अकादमीवरही जॉयने पाच वर्षे काम केले होते. गावातील चर्च संघटना तसेच एका राष्ट्रीय पक्षाच्या कळंगुट गट समितीवरही तो बराच काळ सक्रिय होता


जॉय हा एकेकाळचा नामवंत तियात्रिस्त होता. तसेच त्याच्या मालकीची ओर्डा-कांदोळी तसेच बागा-कळंगुटात स्वत:च्या मालकीची दोन घरे होती‌. मात्र, त्याच्या संपत्तीवर कुणातरी तिसऱ्याची नजर होती, असा त्याला संशय होता.

त्यामुळेच आपल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठीच आठवडाभरापूर्वी जॉयने मालमत्तेची कागदपत्रे भावाच्या मुलांकडे सोपविली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजल 

शनिवारी दुपारी पत्नी बाहेर गेल्यावर जॉयने कॉटवर झोपी गेलेल्‍या पोटच्या मुलांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. मुले गतप्राण होताच, त्याच दोरीच्या आधाराने त्‍याने घरामागील झाडाला गळफास घेत स्वत:ही मृत्यूला कवटाळले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. परंतु घरगुती वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

नवरा-बायकोत तंटे : घटनेनंतर पोलिसांनी चौकशीची सुत्रे जॉयची पत्नी इर्तिया परैरा ई फर्नांडिस हिच्याकडे वळवली आहेत. शेजाऱ्यांनी सांगितले की, जॉय हा बेरोजगार असल्याने नवरा-बायकोत अनेकदा वाद निर्माण होत होते. कदाचित याच रागातून जॉयने हे कृत्य केले असावे, अशी चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments