“जिल्हा स्तरीय चित्रकला स्पर्धेत” कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर चा ‘कृष्णा मकर’ पहिला.

पंढपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेच्या चि.कृष्णा अमर मकर  इ. ९वी या विद्यार्थ्यांने झपूर्झा व पु. ना. गाडगीळ यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या


 जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या जिल्हास्तरीय स्पर्ध्येमध्ये पंढरपूरातील इतर शाळेचे जवळपास १०० विद्यार्थी सहभागी झालेले होते


 या सर्वामधून कृष्णा मकर याने ८वी व ९वी  गटातून प्रथम क्रमांक मिळवून पु. ना. गाडगीळ यांच्या कडून ५० ग्रॅम चांदीचे पदक प्राप्त केले.

चि.कृष्णा मकर याचे अभिनंदन संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा. श्री. रोहनजी परिचारक यांनी करून त्यास पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते कृष्णाला पदक व प्रशस्तिपत्रक प्रदान करून त्याचा सन्मान केला.


यावेळी प्रशालेचे चित्रकला शिक्षक श्री. नारायण कुलकर्णी व वृषाली काळे यांचे  मोलाचे मार्गदर्शन त्यास लाभले. याप्रसंगी कृष्णाचे अभिनंदन प्रशालेच्या सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर  कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments