प्रतिनिधी:सनी आडेकर सालाबादप्रमाणे याहीवर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन २६ जानेवारी रोजी श्री गणेश निळकंठ सामाजिक संस्था व श्री जय गणेश सामाजिक संस्था (अ/ब)या दोन्हिही संस्थाच्या वतीने संयुक्त रित्या सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले
सकाळी दहा वाजता पुजा सुरु होऊन उत्कृष्ट रित्या रहिवाशांनी यावेळी विद्युत रोषणाई ,व नेत्रदिपक मखराच्या सजावटीने उत्साहपुर्ण वातावरणात भर पडली गेली यावेळी लहान मुलांचे स्पर्धाचे आयोजन,महिलांचे हळदिकुंकू, या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले
यावेळी विविध राजकिय पक्षांच्या मान्यवर मंडळीनी यावेळी या पुजेला आपली उपस्थिती दाखवली ,रहिवाशांना भेडसावणार्या समस्यांवर नक्कीच सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी उपस्थित रहिवाशांना दिले
सुस्वर भजनाने यावेळी उपस्थितांची मने जिंकली त्यानंतर मान्यवरांचे भाषण सत्कार ,व लहान मुलांच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पुजेची व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हि कार्यक्रमाची धुरा यशस्वी पार पाडण्यासाठी यावेळी श्री बबन गावणुक,श्री जितेंद्र घडशी, एकनाथ पंदेरे,रमेश शेडगे,महम्मद जहिर, जनार्दन वणे,संतोष सिह,गणेश लाड,राजेश गावणुक,सुरजित सिह,मुन्ना गुप्ता,विजय कुळे ,शांताराम इंगळे,जितेंद्र पाते ,अनिल तांदळे, इरफान,सुनिल तटकरे,संतोष पांडे,भरत पवार,धीरज सिह,विशाल पाडेकर,ईत्यादि रहिवाशी,मान्यवर कार्यकर्ते,यांचे मोलाचे सहकार्य यावेळी या दोन्हीही संस्थाना लाभले व सत्यनारायण महापुजा भक्तिभावाने उत्साहपुर्ण वातावरणात पार पडली




0 Comments