पुतण्याच्या मृत्यूची खबर ऐकताच काकुनेही सोडले प्राण...

 

जळगावमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यात पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील एका 27 वर्षीय तरुणाचं धावत्या रेल्वेचा धक्का लागून अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली.


घटनेची माहिती कुटुंबाच्या सदस्यांना माहिती होताच सर्वांनी एकच आक्रोश केला. यात मयत तरुणाची काकू हिने या घटनेचा धसकाच घेतला. त्यावेळीच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराचा झटका आल्याने काकूला जळगाव येथे उपचारासाठी नेण्यात येत होतं.


मात्र रस्त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे हनुमान नगर परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सोनार कुटुंबातून एकाच दिवशी दोन अंत्ययात्रा निघाल्याने ऐन संक्रांतीच्या सणाच्या तोंडावर सोनार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


शहरातील हनुमान नगर भागातील रहिवाशी दादाभाऊ मोरे आणि त्यांच्या दोन्ही भावांचे कुटुंब एकाच ठिकाणी राहतात. 11 जानेवारी रोजी दादाभाऊ मोरे हे त्यांच्या काकांच्या उत्तरकार्यासाठी वरखेडी येथे गेले होते. उत्तरकार्य आटोपून आल्यानंतर त्यांचा लहान मुलगा किरण मोरे हा कामानिमित्त शहरातील दुसर्‍या भागाकडे जात असताना पाचोरा ते गाळण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे लाईन क्रास करत असताना त्याचा अपघात झाला. मुंबईहून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने किरण यांचा जागीच मृत्यू झाला.  या तरुणाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याआधी कुटुंबावर दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळळा. जेव्हा ही बातमी ऐकताच मृताच्या काकूला हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचंही निधन झालं. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments