सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना हक्काचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. शिवाय सोशल मीडियामुळे अनेकजण एका रात्रीत स्टार झाल्याचंही आपण पाहिलं आहे. कोणी आपल्या भन्नाट डान्समुळे तर कोणी आपल्या आवाजामुळे रात्रीत फेमस झाल्याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील मुलगा एका फळ्यावर आधी ताजमहालचे इंग्रजीत स्पेलिंग लिहितो आणि त्या स्पेलिंगवरच ताजमहालचे सुंदर चित्र बनवतो. सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसत आहे. कारण अनेकांनी हा व्हिडीओतील मुलाचे तोंडभरुन कौतुक केलं आहे.
व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, एक मुलगा एका फळ्यावरती खडूने चित्र काढताना दिसत आहे. तो पहिल्यांदा इंग्रजीत ताजमहाल हा शब्द लिहितो आणि त्यानंतर तो या स्पेलिंग न पुसता त्यावरच ताजमहालच चित्र काढतो. ताजमहालचे चित्र काढणाऱ्या या मुलाचा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचे स्पेलिंग ब्लॅकबोर्डवर लिहून या व्यक्तीने चित्र काढल्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर तो आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. शिवाय नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना मुलाचे तोंडभरुन कौतुकही करत आहेत.




0 Comments