धक्कादायक! सावत्र बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीची गळा आवळून केली हत्या

 

    नवी दिल्ली - गुजरातमधील राजकोट शहरात सावत्र बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. यानंतर त्यानेच मृतदेह छातीला कवटाळून झुडपात फेकून दिला. गोंडल चौकासमोरील झुडपात दोन दिवसांपूर्वी मुलीचा मृतदेह  आढळून आला होता. आरोपी वडील गुजरातमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र ट्रेन पकडण्यापूर्वीच गुन्हे शाखेने त्याला अटक केली.


    मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर प्राथमिक तपासातच तिची गळा आवळून हत्या केल्याची बाब समोर आली होती. मुलीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि शनिवारी दुपारचे एक फुटेज सापडले, ज्यामध्ये आरोपी वडील मुलीचा मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे.


    अडीच वर्षांची अनन्या ही आपली सावत्र मुलगी असल्याचे आरोपी वडील अमित गोर याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. शुक्रवारी दुपारी तिने कारखान्यात काम करणाऱ्या आईकडे जाण्याचा हट्ट धरला. अमितने नकार देताच ती रडू लागली. तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती शांत न झाल्याने त्याने तिचे डोके भिंतीवर आदळले आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. पकडले जाण्याच्या भीतीने गोंडल चार रस्ता येथील निर्जन भागातील झुडपात मृतदेह फेकून दिल्याचे आरोपीने सांगितले.


    आपल्या मुलीचा मृतदेह फेकून देऊन तो घरी परतला. यानंतर त्याने पत्नीला मुलगी बेपत्ता झाल्याची खोटी कहाणी सांगितली आणि पत्नीसह तिचा शोध घेण्यात मग्न झाला. पोलिसांची पथके सक्रिय झाल्यावर अमितला पकडले जाण्याचा संशय असल्याने तो रविवारी फरार झाला होता.

Post a Comment

0 Comments