ट्रक - कार अपघातात युवती ठार, दोन जण जखमी

 

यवतमाळ जिल्ह्यातील सोनवाढोणा गावाजवळ ट्रक आणि कार या दाेन वाहनांत झालेल्या अपघातात युवती ठार झाली. 


या अपघातात दाेन जण जखमी झाले आहेत. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.


घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार सोनवाढोणा गावाजवळ कार आणि ट्रक या दोन वाहनांची एका वळणावर धडक झाली.

 अपघातग्रस्त ट्रक यवतमाळहून नेरच्या दिशेने जात होता तसेच कार यवतमाळकडे येत होती.


या अपघातात आचल दयानंद निवाने या युवतीचा मृत्यू झाला. करण निवाने व साक्षी खरवडे हे दोघे जखमी झाले आहेत. 

त्यांना यवतमाळ  येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात  ट्रकच्या धडकेमुळे कारचा पूर्णपणे चुरडा झाला आहे.

Post a Comment

0 Comments