लग्न जुळत नसल्याने 23 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

 

बेळगाव : लग्न जमत नसल्याने नैराशेच्या भरात तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाल सुनील पवार (वय २३, रा. पाचवा क्रॉस समर्थनगर) असे त्याचे नाव असून सोमवार (ता.३०) सायंकाळी ही घटना उघडकीस आली आहे.


घटनेची नोंद मार्केट पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, विशाल हा लग्नासाठी गेल्या काही वर्षांपासून मुली पहात होता. मात्र, आजपर्यंत कोठेही त्याचे लग्न जमले नाही. 


त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक दृष्ट्या अस्वस्थ बनला होता. याच कारणावरून नैराशेच्या भरात त्याने घरातील पत्राच्या लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.


घटना उघडकीस येताच ही माहिती पोलिसांना कळविण्यात आली. काही वेळानंतर मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Post a Comment

0 Comments