वाकड परिसरातील एका सोसायटीत आज एक दुर्देवी घटना घडली. या घटनेत मुलासह त्याच्या पित्याने बाराव्या मजल्यावरुन उडी मारली आहे.
या घटनेची माहिती कळताच वाकड पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाकड पाेलिसांनी घटनेचा तपास सुरु केलेला आहे. या तपासात पाेलिसांना धक्कादायक गाेष्ट समजली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पित्याने आपल्या साेळा वर्षीय मुलासह बाराव्या मजल्यावरून उडी मारली.
त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आधी मुलाला खाली फेकले त्यानंतर पित्याने उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हे दोघेही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याची पाेलिसांनी नमूद केले.




0 Comments