दारूच्या नशेत पतीकडून पत्नीचा खून

 

कळंबपासून जवळच असलेल्या खोरद येथे पतीने पत्नीच्या डोक्यावर कुर्‍हाडीच्या दांडक्याने वार करून  खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे 


मृतक शोभा मारुती झोरे (वय 42) व पती मारुती महादेव झोरे (वय 45) हे दोघेही पती-पत्नी शेतामध्ये दोघेही पीत होते. या दरम्यान त्यांच्यात कोणत्या तरी मुद्यावरून भांडण झाले. 


त्यामध्ये पत्नीच्या डोक्यावर संशयित आरोपी पती मारुती याने कुर्‍हाडीच्या दांड्याने वार केला. यात पत्नी शोभा जागीच ठार झाली. रात्री शेतावर जागलीसाठी गेलेे असता दोघांमध्ये रात्री उशीरा भांडण झाले.

ही माहिती मोठ्या मुलाला सकाळी मिळताच त्याने आपली मावशी सुमित्रा हुसेन शिवणकर यांना फोनवरून सांगितले व घटनास्थळी पोचण्यास सांगितले. 


त्यावेळी मृतक शोभाचे पती मारुती झोरे प्रेताजवळच बसून होते व त्यांनी भांडण झाले एवढेच सांगितले.कळंब पोलिस ठाण्यात आरोपी मारुती झोरे याच्यावर भादंवि 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार अजित राठोड करीत आहेत.



Post a Comment

0 Comments