बॉयफ्रेंडचं लग्न झालं तरी भेटण्यासाठी दबाव टाकत होती गर्लफ्रेंड

 

अनैतिक संबंधातून देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्क्दायक घटना समोर आली आहे. घर वाचवण्यासाठी विवाहित प्रियकराने आधीच्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केली.


आरोपीची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. यानंतर दुसरे लग्न केल्यानंतरही त्याची प्रेयसी तिला भेटण्यासाठी दबाव टाकत असे. याला कंटाळून आरोपी सिराजने तिची हत्या केली. ही घटना बछरावां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.


याठिकाणी 1 जानेवारी रोजी सलमा नावाच्या मुलीचा मृतदेह विहिरीतून सापडला होता. मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाईलचा सीडीआर तपासला असता सिराज नावाच्या तरुणाचे नाव याप्रकरणात समोर आले. मृत सलमासोबत सिराजचे प्रेमसंबंध होते.


पोलीस आपल्याला अटक करतील असा संशय सिराजला असल्याने तो पळून गेला. फरार असताना बुधवारी रात्री मारेकरी सिराज हा त्याचा मित्र मोहरम अली याच्यासोबत अल्टो कारमधून बछरावां पोलीस स्टेशन परिसरातून जात होता. यावेळी पोलिसांची नियमित तपासणी सुरू होती. पोलिसांनी दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना पाहताच दोघेही गाडीतून खाली उतरले आणि पळू लागले. पाठलाग केल्यावर सिराजने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यावर दोघांच्याही पायाला गोळी लागली. पोलिसांनी चौकशी केली असता दोघेही सलमाचे मारेकरी निघाले.


Post a Comment

0 Comments