सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकजण जीवघेणे स्टंट करतात. धोकादायक स्टंट करणं अनेकांना महागात पडल्याचंही आपण पाहिलं आहे. तरीही जीवघेणे स्टंट करण्याची अनेकांची सवय काही केल्या जात नाही.
सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये स्टंटबाजी करण्याची मोठी क्रेझ आली आहे. प्रत्येकजण इतरांपेक्षा काहीतरी वेगळ करुन दाखवण्याच्या नादात वेगवेगळे स्टंट करतो. या स्टंट करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक बाईकस्वारांचा समावेश असतो. अशाच एका तरुणाला बाईकवर स्टंट करणं अंगलट आल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडी
याचवेळी तो अचानक खूप जोरात रस्त्यावर पडतो आणि रसत्यावरुन फरपटत जातो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी जीवावर बेततील असे स्टंट करण्याता वेडेपणा करु नये असं म्हणत आहेत. तर सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना कॅप्शनमध्ये एवढा धोकादायक स्टंट करण्याची गरज नव्हती असं लिहिलं आहे.




0 Comments