वाघीण बछड्यांसोबत रस्ता ओलांडत होती तेवढ्यात वन अधिकाऱ्यांनी....

 

कधी जंगल सफारीला गेलाय? जंगल सफारीला जाणाऱ्या पर्यटकांना जंगलातील वाघ, सिंह यांसारखे प्राणी क्वचित वेळा पाहायला मिळतात. तर अनेकवेळा कोणताच प्राणी पाहायला न मिळाल्याने अनेकांचा हिरामूड होतो.


जंगलातून प्रवास करत असताना अनेकवेळा अशा जंगली प्राण्यांचे दर्शन होत असते. असाच एक व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल होत आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वाघीण आपल्या पिल्लांना घेऊन रस्ता ओलांडत असून पलीकडे वाहनांची गर्दी थांबलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडओ आहे महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातला. वाघ रस्ता ओलांडत असल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे वाहने रोखून धरले आहेत.


दरम्यान, या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या असून सदर वन अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. अनेकवेळा जंगलातून प्रवास करताना जंगली प्राणी आक्रमक होऊ शकतात. त्यामुळे जंगलातून वाहने चालवताना किंवा प्रवास करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तर आपल्यामुळे जंगली प्राण्यांना त्रास होणार नाही याचीसुद्धा काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Post a Comment

0 Comments