पंढरपूर दि.12 : शासनाकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेची परतफेड करण्यास कसूर केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 19 जानेवारी 2023 रोजी करण्यात येणार आहे. हा लिलाव महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 च्या कलमान्वये थकबाकीदारांना क्रमांक 1 व 2 ची नोटीस देऊन आणि कलम 180 अन्वये थकबाकीदारांना क्रमांक 3 ची नोटीस देऊन जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येत आहे. जाहीर लिलावातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून आरआरसीची रक्कम शासन जमा करण्यात येणार असल्याचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी कळविले आहे.
दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी लिलाव करण्यात येणा-या मालमत्तेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विविध औद्योगिक सह.संस्था मर्या. मंगळवेढा चेअरमन यांच्या मौजे मंगळवेढा जमीन गट.नं.2705/6 मधील क्षेत्र 3500 चौ.मी (वसूल पात्र रक्कम रुपये 73.35 लक्ष रुपये तर दुय्यम निंबधक यांच्याकडील मुल्यांकन 3446500/-) , अनंतराव शिंदे मागासवर्गीय व औद्योगिक
सह.संस्था मंगळवेढा, चेअरमन यांच्या मौजे मंगळवेढा येथील जमीन गट.नं.282/4ब/1 मधील क्षेत्र 157.00 आर चौ.मी व जमीन गट.नं.282/1/अ/1 मधील क्षेत्र 60.00 आर चौ.मी.(वसूल पात्र रक्कम रुपये 170.79 लक्ष रुपये तर दुय्यम निंबधक यांच्याकडील मुल्यांकन अनुक्रमे 11618000/- व 4920000) , चरणसेवा/अनंत मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था यांच्या मौजे मंगळवेढा येथील जमीन गट.नं.284/4/भ मधील क्षेत्र 4100 चौ.मी व जमीन गट.नं.284/4ब/1 मधील क्षेत्र 157.00 आर चौ.मी.(वसूल पात्र रक्कम रुपये 168.21 लक्ष रुपये तर दुय्यम निंबधक यांच्याकडील मुल्यांकन अनुक्रमे 3362000/- व 11618000/-) , या खातेदारांनी शासनाकडून घेतलेले कर्ज परत करण्यास कसूर केली असल्याने त्यांच्या गहाण संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावाच्या दिवशी खरेदीदार म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तीस त्याने बोली केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के अनामत रक्कम तात्काळ भरावी लागेल.
लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तेची संपूर्ण माहिती आवश्यक असल्यास तहसिल कार्यालय मंगळवेढा येथील अभिलेख विभागाशी संपर्क साधावा. तसेच लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजले पासून उपस्थित रहावे असे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी कळविले आहे.




0 Comments