आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश , व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

 

राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. जया यांना कॅन्सर आणि ब्रेन ट्युमर होता. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


राखी सावंतने स्वतः या वृत्ताची पुष्टी केली होती. आईच्या अखेरच्या दिवसांमध्ये राखी तिच्याबरोबर होती. पण त्यांच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. तिचा एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


आईचं पार्थिव रुग्णालयातून बाहेर नेत असताना राखी सावंत ढसाढसा रडताना दिसली. रुग्णालयातील राखीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात ती जोरजोरात अक्रोश करून रडताना दिसत आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात राखी सावंत आईचं पार्थिव घेऊन बाहेर निघत असताना दिसत आहे.


व्हिडीओमध्ये राखी सावंत खूपच भावुक झाल्याचं दिसत आहे. ती खूप प्रयत्नांनी स्वतःला सांभाळताना आणि आक्रोश करून रडताना दिसत आहे. रडत रडत ती आपल्या आईला हाक मारत असल्याचंही दिसत आहे. राखी सावंतला अशा अवस्थेत पाहून तिथे उपस्थित असलेले सगळेच भावुक झालेले दिसत आहेत. एवढंच नाही तर या व्हिडीओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनीही राखीच्या आईसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments