सर्वच पातळीवर ग्रामीण पत्रकार व पत्रकारितेची उपेक्षाच ; वर्धा(विदर्भ)येथे राम खुर्दळ यांचे व्याख्यान


नाशिक: गावाच्या मूलभूत विकासाचा दुवा असणारी ग्रामीण पत्रकारिता ही माध्यमांचे मूलभूत अंग आहे.मात्र याच ग्रामीण पत्रकारितेची सर्वच पातळीवर होणारी उपेक्षा तसेच शासकीय व सामाजिक स्थरावर दुय्यम वागणूक ही सल ग्रामीण भागात राबणाऱ्या प्रत्येक पत्रकारांस आहे.यावर आवाज उठवूनही त्याकडे सातत्याने शासन,प्रशासन, व सामाजिक पातळीवर कमालीचे दुर्लक्ष राहिले असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार,माध्यमकर्मी राम खुर्दळ यांनी 'ग्रामीण पत्रकारितेचे वास्तव" विषयावर बोलतांना "वर्धा" (विदर्भ) येथे मांडली.


  ते वर्धा येथे पत्रकार संरक्षण समिती,महाराष्ट्र या मान्यताप्राप्त संघटनेच्या पत्रकार दिनानिमित्त ठेवलेल्या "ग्रामीण पत्रकारितेचे वास्तव" विषयावर व्याख्यान होते त्या प्रसंगी त्यांनी पुढे बोलतांना अनेक मूलभूत मुद्दे मांडतांना त्यांनी "विदर्भ ही गांधीजींच्या सेवाग्राम येथील वास्तव्याची पावन भूमी,भूदान चळवळीचे जनक विनोबाजी भावे,आनंदवन चे डॉ.बाबा आमटे,संत गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराजांची ही भूमी या विभूतींचे योगदान ग्रामीण विकासात आहे.मात्र "गावचा विकास हाच देशाचा विकास"याकडे सर्व पातळीवर दुर्लक्ष होत आहे.


याच गावांचे मुद्दे मांडणाऱ्या ग्रामीण पत्रकारांच्या अनेक पिढ्यांच्या पिढ्यांच्या पदरी उपेक्षेशिवाय काही पडले नाही.केवळ तुटपुंज्या मानधनावर किंवा तेही मिळत नसलेल्या ग्रामीन पत्रकारांना अधिस्वीकृती व पत्रकार संरक्षनाचा हक्क,प्रवासात सवलत,आरोग्याच्या सेवा,पाल्यांना शिक्षणे,विमा,रोजगार  राहण्यासाठी घरे,मिळत नाही.जिल्हा माहिती केंद्र व शासकीय कार्यालयात त्यांची नोंद नाही,तिथे ही दुय्यम वागणूक मिळते व प्रशासन व शासनाला हा स्तर कळत नाही.संसद,विधिमंडळ येथे अश्या घटकांचा एक ही प्रतिनिधी नाही.


यावर पत्रकार संरक्षण समितीने असंख्य पत्रे देऊन पाठपुरावा केला मात्र सरकार व माहिती विभाग गंभीर नाही,असंख्य ग्रामीण पत्रकार जे तळागाळातील जनतेचा आरसा आहेत तेच सर्वसामान्य मूलभूत गरजांपासून वंचित असतील तर,अश्या स्थितीत हा घटक जगणार कसा?असा सडेतोड सवाल यावेळी व्याख्याते राम खुर्दळ यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी खा.रामदास तडस,किसान संघटनचे विजय जावंदिया,पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक विनोद पत्रे,जेष्ठ समाजसेवक अग्रवाल यासह रविराज घुमे,योगेश कांबळे,संदीप रघाघाटे,संजय धोंडगे,इम्रान राही,बाळाभाउ पचारे,पंकज गादगे यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments