आजकाल विद्यार्थ्यांना अभ्यासाचं खूप प्रेशर असतं. त्यामुळे बरेच विद्यार्थी आपल्या अभ्यासाबाबत खूप गंभीर असतात. तेच दुसरीकडे काहीजण अभ्यासाचा जास्त लोड घेत नाही.
अभ्यासापासून वाचण्यासाठी ते काहीतरी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी अनेक भन्नाट शक्कल विद्यार्थी लढवताना दिसतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
अभ्यासापासून वाचण्यासाठी चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला विद्यार्थी आपल्या मॅडमला आपल्या मनातलं सांगताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, मॅडम चिमुकल्याला स्वतःबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहेत.
चिमुकलाही मॅडमचं तोंडभरुन कौतुक करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ वर्गात शूट करण्यात आला आहे. चिमुकला शाळेच्या गणवेशात दिसत आहे.
तो एका मॅडमशी बोलताना दिसतोय. मुलगा मॅडमला सांगताना दिसतोय की तुम्ही साडी नेसून आल्या होत्या तेव्हा खूप छान दिसत होत्या. मॅडम त्याला विचारतात की का चांगली दिसत होते? यावर चिमुकला म्हणतो की, कारण ती की खूप चांगली साडी होती आणि तुम्ही माझ्या फेवरेट मॅम आहात.
मॅडमदेखील चिमुकल्याचा कौतुकाने आनंदी झाल्या आणि त्याचम आभार मानतात. @Sunilpanwar2507 या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं, 'अभ्यासापासून वाचण्याचा मार्ग'. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून चिमुकल्याचा हा क्युट अंदाज अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडीओ एक वेळा नाही तर अनेक वेळा पाहिला जात आहे.




0 Comments