सिन्नरला गळफास घेत विद्यार्थ्याची आत्महत्या

शहरातील तिकोणे गल्लीतील विद्यार्थ्याने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आयुष राजेंद्र खराडे (१८) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


राजेंद्र खराडे यांचा मुलगा आयुष हा बारावीत शिकत होता. 


काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास आयुषने घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीतील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. 


ही बाब कुटूंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यास नगरपालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 नगरसेवक प्रमोद चोथवे यांनी सिन्नर पोलिसात माहिती दिली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एएसआय धुमाळ तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments